मला कधीच वाटत नाही , मला कधीच वाटत नाही कि मला सारं सुखं मिळावं ..... पण दुःखाने माझ्या आनंदाला कधी न गिळावं ...... मला कधीच वाटत नाही , समोरच्याने मला योग्य समजावं ..... पण गैरसमज करून कधीच चुकीचं न ठरवावं .... मला कधीच वाटत नाही , मी प्रत्येक वेळी योग्यच असेल , पण दिखावा करत अप्रामाणिक मात्र नक्कीच नसेल ! मला कधीच वाटत नाही लोकांनी माझी प्रत्येक वेळेस साथ द्यावी , पण छोट्याश्या स्वार्थासाठी गुंफलेली नाती मात्र ना तोडावी , गुंफलेली नाती मात्र ना तोडावी ! V !