मला कधीच वाटत नाही , मला कधीच वाटत नाही कि मला सारं सुखं मिळावं .....
पण दुःखाने माझ्या आनंदाला कधी न गिळावं ......
मला कधीच वाटत नाही , समोरच्याने मला योग्य समजावं .....
पण गैरसमज करून कधीच चुकीचं न ठरवावं ....
मला कधीच वाटत नाही , मी प्रत्येक वेळी योग्यच असेल ,
पण दिखावा करत अप्रामाणिक मात्र नक्कीच नसेल !
मला कधीच वाटत नाही लोकांनी माझी प्रत्येक वेळेस साथ द्यावी ,
पण छोट्याश्या स्वार्थासाठी गुंफलेली नाती मात्र ना तोडावी ,गुंफलेली नाती मात्र ना तोडावी !
V!
Comments